|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » केसरी वाडामध्ये लोकमान्यांना समर्पित रंगावली प्रदर्शन

केसरी वाडामध्ये लोकमान्यांना समर्पित रंगावली प्रदर्शन 

पुणे / प्रतिनिधी

पुण्यातील प्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले 33 वे रंगावली प्रदर्शन यंदा लोकमान्य टिळकांना समर्पित आहे. ‘लोकमान्य’ असे या प्रदर्शनाचे नामकरण असून नारायण पेठेतील केसरी वाडा, जयंत सभागृहमध्ये हे प्रदर्शन 13 ते 21 सप्टेंबरपासून दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. रोहित टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध शास्त्राrय गायिका मंजुषा पाटील यांच्या हस्ते 13 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. रंगावलीकार चव्हाण यांच्या 15 ते 55 वयोगटातील 23 विद्यार्थ्यांनी रांगोळ्या साकारल्या आहेत. प्रदर्शन विनामुल्य असून पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दुपारी 2 ते 5 ही वेळ प्रदर्शन पहाण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रदर्शनात लोकमान्य टिळकांच्या जीवनातील ठळक प्रसंगांच्या 18 रांगोळ्या चितारण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेवेळी श्रीरंग कलादर्पणचे अक्षय शहरापूरकर उपस्थित होते.