|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » जिओ देणार उपग्रहाच्या माध्यमातून 4जी सेवा

जिओ देणार उपग्रहाच्या माध्यमातून 4जी सेवा 

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडकडून 4जी सेवा देण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात 4जी सेवेचा विस्तार करण्यासाठी कंपनीकडून हय़ुज उपग्रहाचा वापर करण्यात येईल. यामुळे देशातील 400 पेक्षा अधिक गावाने अत्याधुनिक 4जी सेवा मिळण्यास मदत होईल.

सध्या इंटरनेट सेवा देण्यासाठी उपग्रहाचा वापर वेगाने वाढत आहे. यामुळे हय़ुज ज्युपिटर स्टिस्टमचा वापर करत भविष्यातील तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना सेवा देण्यास मदत होईल असे रिलायन्स जिओ समूहाचे अध्यक्ष ज्योतिंद्र ठाकर यांनी सांगितले. हय़ुज इंडियाकडून नेटवर्क प्लॅनिंग, उभारणी, पाहणी, देखरेख ठेवण्याचे काम करण्यात येईल. जिओची सेवा दुर्गम भागात पोहोचण्यास मदत होईल आणि सामान्यांनाही त्याचा लाभ घेता येईल, असे हय़ुज कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले.

Related posts: