|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » टीव्हीच्या सुटय़ा भागांची आता देशातच होणार निर्मिती

टीव्हीच्या सुटय़ा भागांची आता देशातच होणार निर्मिती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मार्च महिन्यात केंद्र सरकारने टीव्हीच्या सुटय़ा भागांवरील आयात शुल्कात मोठय़ा प्रमाणात वाढ केली होती. ओपन सेल पॅनेलवरील वाढविण्यात आला होता. यामुळे एलसीडी आणि एलईडी टीव्हीची विदेशातून आयात करणे महाग झाले होते. मात्र त्याचा परिणाम विक्रीवर झाल्याने कंपन्यांनी देशातच उत्पादन घेण्याचा निर्णय घेतल्याने ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन मिळणार आहे.

बीपीएल, स्कायवर्थ, थॉमसन, सीसीएल, शाओमी या कंपन्यांनी स्थानिक पातळीवर सुटय़ा भागांचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या काही महिन्यात या ब्रॅन्डच्या विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. आयात शुल्काने कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम दिसून आला होता. सध्या चीन, थायलंड आणि मलेशियातून आयात करण्यात येणाऱया टीव्ही सेटवर 20 टक्के आयात कर द्यावा लागतो. प्रिमियम सीरीजमधील ओएलईडी, 4के मॉडेलचे उत्पादन घेणाऱया कंपन्यांनीही पीसीबी आणि मोल्डचे देशात उत्पादन घेण्यास प्रारंभ केला.