|Friday, November 16, 2018
You are here: Home » उद्योग » गुगल भारतातच ठेवणार पेमेन्ट्स डेटा

गुगल भारतातच ठेवणार पेमेन्ट्स डेटा 

नवी दिल्ली

 रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार पेमेन्ट्स प्रणालीसाठी गुगलने भारतातच डेटा साठवणूक करण्यास सहमती दिली आहे. मात्र आवश्यक असणाऱया प्रणालीसाठी डिसेंबरपर्यंत मुदत मागितल्याचे सांगण्यात आले. सध्या भारतात देयक सेवा देणाऱया कंपन्यांना देशातच माहिती साठविण्यासाठी आरबीआयकडून 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. गुगलसह यामध्ये व्हिसा, अमेरिकन एक्स्प्रेस, फेसबुक, पेपल आणि मास्टरकार्ड या विदेशी कंपनीच्या समावेश आहे. सध्या या कंपन्यांकडून मर्यादित प्रमाणात डेटा साठविण्यात येतो.

 सध्या गुगल पेकडून देशांतर्गत सेवा देण्यात येते, मात्र व्हिसा, मास्टरकार्डच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय व्यवहार होत असल्याने त्यासाठी अधिक डेटा आवश्यक असतो. गेल्या आठवडय़ात आरबीआयने देशातच डेटा साठविण्याच्या प्रक्रियेची माहिती मागविली होती.

Related posts: