|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » उद्योग » रुपयामुळे बाजाराची पाच शतकी पडझड

रुपयामुळे बाजाराची पाच शतकी पडझड 

सेन्सेक्स 509 अंकाने घसरला : रुपयाने गाठला नवीन निचांक

वृत्तसंस्था/ मुंबई

रुपया सार्वकालिक निचांकावर पोहोचलण्याने बाजारात होणारी पडझड सलग दुसऱया दिवशी कायम होती. रुपया 72.73 वर पोहोचल्याने बीएसईचा सेन्सेक्स 509 अंकाने कोसळत बंद झाला. मंगळवारी एफएमसीजी, धातू, वाहन आणि वित्त क्षेत्रातील समभागात जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स 1 टक्क्यापेक्षा अधिक कमजोर झाला. आंतरराष्ट्रीय संकेतामुळे सेन्सेक्स एका महिन्याच्या निचांकावर पोहोचला आहे.

बीएसईचा सेन्सेक्स 509 अंकाने कोसळत 37,413 वर बंद झाला. 2 ऑगस्ट रोजी बाजार 37,165 वर स्थिरावला होता. एनएसईचा निफ्टी 150 अंकाने घसरत 11,287 वर बंद झाला.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमजोर रुपया, वाढती व्यापारी तूट, आंतरराष्ट्रीय नकारात्मक संकेत यामुळे बाजारात घसरण झाली. अमेरिकेने इराणच्या पेट्रोलियम उद्योगावर बंदी घालण्याचे संकेत दिल्याने ब्रेन्ट तेलाचे दर 78.52 डॉलर्स प्रतिपिंपावर पोहोचले आहेत.

चालू महिन्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बैठक होणार असून त्यामध्ये व्याजदर वाढीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रुपया अधिक कमजोर होईल आणि उभरत्या बाजारातील विदेशी गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता आहे.

बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 2.47 टक्के, एफएमसीजी 2.25 टक्के, दूरसंचार 2.20 टक्के, रिअल्टी 1.78 टक्के, इन्फ्रास्ट्रक्चर 1.71 टक्के, धातू 1.66 टक्के, आरोग्यसेवा 1.59 टक्के, वाहन 1.52 टक्के, युटिलिटी 1.44 टक्के, बँकेन्स आणि वित्त निर्देशांक प्रत्येकी 1.40 टक्क्यांनी घसरले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील 3.46 टक्के, पॉवरग्रिड 3.21 टक्के, आयटीसी 2.92 टक्के, हिंदुस्थान युनिलिवर 1.19 टक्क्यांनी घसरले. ऑगस्टमध्ये सलग दुसऱया महिन्यात वाहनांची विक्री घटल्याने यासंबंधित कंपन्यांच्या समभागात विक्री झाली. बीएसईमध्ये 1,841 कंपन्यांचे समभाग घसरले, तर 874 वधारले. बीएसईचा स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक प्रत्येकी 1.37 टक्क्यांनी घसरले.

जपानची निक्केई वगळता अन्य आशियाई बाजारात घसरण झाली.

Related posts: