|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सोन्याच्या डब्यात जेवायचा चोर!

सोन्याच्या डब्यात जेवायचा चोर! 

पोलिसांनी चोरांना केली अटक : मुद्देमाल हस्तगत

हैदराबाद

 निजामाच्या वस्तुसंग्रहालयातील मौल्यवान वस्तूंच्या चोरी प्रकरणाच्या तपासात अजब खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी दररोज निजामाच्या सोन्याच्या डब्यात जेवणाचा आनंद घेत होते.

चोरांनी मौल्यवान वस्तूंसह मुंबईत पलायन केले होते. दोन्ही चोर मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. 4 किलो सोने, हिरे, माणिकजडित सोन्याचा टिफिन निजामशाली राहणीमानाचं प्रतीक आहे. कोटय़वधी रुपयांचे मूल्य असलेला हा टिफिन बॉक्स निजामाने वापरला असेलच असे नाही, पण दोनपैकी एक चोर रोज यातूनच जेवायचा. 

2 सप्टेंबर रोजी दोन्ही चोर व्हेंटिलेटरच्या मार्गाने वाडय़ातल्या खोल्यांमध्ये दाखल झाले. त्यांनी लोखंडी ग्रील तोडून वस्तूसंग्रहालयात प्रवेश केला. परिसरातल्या सीसीटीव्हींचे चित्रण तपासून पोलिसांनी चोरीचा छडा लावला आहे.

वस्तुसंग्रहालय

हैदराबाद येथील वस्तुसंग्रहालयात वस्तूंची किंमत 250 ते 500 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे समजते. 1967 मध्ये निजाम मीर उस्मान अली खान याच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक वस्तू अवैधमार्गाने देशाबाहेर गेल्या होत्या. निजामाकडे 400 टन सोनं आणि 35 किलो वजनाचे हिरे होते.