|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महिला आयोगाची भीती वाटत नाही!

महिला आयोगाची भीती वाटत नाही! 

केरळच्या आमदाराचे नवे वादग्रस्त विधान

कोट्टायम

 जालंधरचे बिशप प्रँको मुलक्कलवर बलात्काराचा आरोप करणाऱया ननविरोधात टिप्पणी केल्यानंतर केरळचे आमदार पीसी जॉर्ज यांनी मंगळवारी नवा वाद ओढवून घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच्या विधानावर ठाम असून त्याबद्दल मला कोणताच खेद नाही. महिला आयोगाच्या कोणत्याच कारवाईची भीती नसल्याचेही त्यांनी म्हटले.

नन वेश्या असल्याबद्दल कोणालाच संशय नाही. 12 वेळा तिने लैंगिक संबंधांचा आनंद घेतला, मग 13 व्या वेळा तो बलात्कार कसा ठरला? तिने पूर्वीच का तक्रार केली नाही, असे जॉर्ज यांनी म्हटले होते.

ननने चर्चच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविले आहे. ननसोबतच तिच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी केली जावी. आयोगाच्या कारवाईची भीती नसल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.

एसआयटीकडून चौकशी

बलात्काराच्या आरोपांप्रकरणी बिशपच्या विरोधात एसआयटीने चौकशी चालविली आहे. बिशपकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे पीडितेने म्हटले आहे. एसआयटी लवकरच नोटीस बजावून बिशपला पाचारण करणार आहे. सध्या आरोपी प्रँको मुलक्कल हे जालंधर येथे आहेत.

बलात्काराचे प्रकरण व्हॅटिकनच्या दारात

पीडित ननने व्हॅटिकन सिटीतील पोप फ्रान्सिस यांच्या प्रतिनिधींना पत्र लिहून स्वतःची तक्रार नोंदविली आहे. बिशपने पैसा आणि राजकीय बळाचा वापर करत हे प्रकरण दडपल्याचा आरोप तिने केला. पोपनी याप्रकरणी त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणीही तिने केली. बिशप मुलक्कलने 2014-2016 या कालावधीत आपले शारीरिक शोषण केल्याचे सांगत पीडित ननने याप्रकरणी अनेकांची मदत मागितली, परंतु कोणीच धावून आले नसल्याची कैफियत मांडली.