|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » संपुआमुळे बँकिंग व्यवस्थेला फटका!

संपुआमुळे बँकिंग व्यवस्थेला फटका! 

एनपीएवरून भाजपचे काँग्रेसवर टीकास्त्र : नॅशनल हेराल्डचा मुद्दा उपस्थित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विधानावरून भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. दोन्ही प्रकरणांमधून काँग्रेसच्या भयावह भ्रष्टाचार उघड होतो. सर्वाधिक बुडित कर्जे 2006-2008 या कालावधीत देण्यात आल्याचे राजन यांनी संसदीय समितीला कळविल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बँकांच्या एनपीएसाठी संपुआ सरकारची मंदावलेली निर्णयक्षमता जबाबदार असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले आहे. राहुल, सोनिया गांधी तसेच प्रियांका वढेरा करदात्यांचा पैसा हडपू इच्छित होते. संपुआ सरकारच्या काळात भारतीय बँकिंग व्यवस्थेवरच आक्रमण झाल्याचा घणाघाती आरोप इराणी यांनी केला.

2010 मध्ये राहुल गांधी कंपनी स्थापन करतात, 2011 मध्ये नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसचे मुखपत्र प्रकाशित करण्याचा अधिकार असणारी कंपनी असोसिएटेड जर्नलची खरेदी केली जाते. राहुल यांनी 90 कोटींचे कर्ज केवळ 50 लाखांत खरेदी केल्याचे इराणी म्हणाल्या.

 हा सर्व प्रकार चकित करणारा होता अशा शब्दांत इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षांना लक्ष्य केले.

असोसिएटेड जर्नलच्या देशाच्या अनेक शहरांमध्ये मालमत्ता आहेत. हे कर्ज खरेदी केल्यानंतर राहुल हे असोसिएटेड जर्नलच्या 99 टक्के हिस्सेदारीचे मालक ठरले आहेत. या कंपनीची देशात हजारो कोटींची मालमत्ता आहे. सोमवारीच दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया तसेच राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली होती.

Related posts: