|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नागालँडच्या दोन जिल्हय़ांचा संपर्क तुटला, पुरानंतर भूस्खलनाचे संकट

नागालँडच्या दोन जिल्हय़ांचा संपर्क तुटला, पुरानंतर भूस्खलनाचे संकट 

कोहिमा

नागालँडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे सर्वाधिक प्रभावित फेक आणि किफिरे जिल्हय़ांचा आता भूस्खलनामुळे संपर्क तुटला आहे. या जिल्हय़ांमध्ये अडकून पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. पायाभूत सुविधांना पोहोचलेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे फेक जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. दोन्ही जिल्हय़ातील प्रशासनाने नुकसानीचा अहवाल शुक्रवारीच केंद्रीय पथकासमोर मांडला आहे. अन्य जिल्हय़ांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत, असे अधिकाऱयांनी सांगितले. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी 10 हजार रुपये तर किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 5 हजार रुपयांची मदत दिली आहे.

भूस्खलनामुळे किफिरे-कोहिमा आणि टय़ूनसांग जिल्हय़ांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग-202 चे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गाला लागून असलेल्या मेलुरी आणि येई पुलाची देखील मोठी हानी झाली आहे. मेलुरी भागाशी रस्तेसंपर्क जोडण्यात आला असला तरीही तेथील मार्ग अवजड वाहनांसाठी सुरक्षित राहिलेला नाही. दीमापूरहून होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील प्रभावित झाल्याने धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Related posts: