|Saturday, February 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दुर्गापूजेसाठी ममतांनी लिहिले गीत, सांस्कृतिक मंत्री देणार आवाज

दुर्गापूजेसाठी ममतांनी लिहिले गीत, सांस्कृतिक मंत्री देणार आवाज 

कोलकाता

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यंदा होणाऱया दुर्गापूजेसाठी एक गीत लिहिले आहे. त्यांनी हे गीत कोलकाताच्या एक लोकप्रिय दुर्गा पूजा समितीसाठी रचले असून या गीताला राज्याचे सांस्कृतिक मंत्री इंद्रनील सेन आवाज देणार आहेत.

‘अगोमोनी’ गीते पुन्हा प्रचलित करण्याच्या उद्देशाने हे गीत लिहिल्याचे दुर्गा पुजा समितीच्या आयोजकांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी म्हटले. ‘अगोमोनी’ हा देवीला आवाहन करणारा पारंपरिक बंगाली गीतप्रकार आहे. हे गीत सर्वांच्या पसंती पडेल, अशी अपेक्षा यावेळी ममतांनी व्यक्त केली आहे.

मागील काही वर्षात दुर्गा पूजेवर अनेक बंधने लादण्यात आल्याने ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधात नाराजी निर्माण झाली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी ममतांनी हे गीत रचल्याची चर्चा आहे.

Related posts: