|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 5 निदर्शकांचा मृत्यू

अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 5 निदर्शकांचा मृत्यू 

जलालाबाद

 अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील मोहम्मद दारा जिल्हय़ात आत्मघाती हल्ला झाला असून यात 19 जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच 57 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱयांनी दिली आहे. निदर्शकांच्या गर्दीत घुसून आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याने ही जीवितहानी झाली आहे. एका पोलीस प्रमुखाच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी स्थानिक लोक रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांनी महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. या निदर्शनांच्या दरम्यानच दहशतवाद्याने स्फोट घडवून आणल्याची माहिती नांगरहार गव्हर्नरांचे प्रवक्ते अताउल्ला खोग्यानी यांनी दिली. जलालाबादच्या प्रांतीय राजधानीत एका कन्याशाळेसमोर झालेल्या दुहेरी स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना नांगरहार प्रांतात सक्रीय आहेत. तालिबानने मागील काही काळात अनेक जीवघेणे हल्ले केले आहेत.

 

Related posts: