|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दोन नौका बुडाल्याने 100 हून अधिक जणांचा मृत्यू

दोन नौका बुडाल्याने 100 हून अधिक जणांचा मृत्यू 

कैरो

 लीबियाच्या किनाऱयानजीक दोन नौका बुडाल्याने 20 मुलांसमवेत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर्स विदाआउट बॉर्डर्सने दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांच्या दाखल्याने ही माहिती दिली. 1 सप्टेंबर रोजी दोन नौका लीबियाच्या किनाऱयावरून रवाना झाल्या होत्या. याचदरम्यान नौका बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली. प्रत्येक नौकेतून 160 जण प्रवास करत होते. दुर्घटनेच्या पीडितांमध्ये गरोदर महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. संघटनेच्या एका पथकाने वैद्यकीय मदत पुरविली आहे. प्रवाशांमध्ये सूदान, माली, नायजर, कॅमेरून, घाना, लीबिया, अल्जीरिया आणि इजिप्तचे नागरिक सामील होते. लीबियाच्या तटरक्षक दलाने दुर्घटनेतून बचावलेल्या 276 जणांना ताब्यात घेत खोम्स शहरात नेले. तर केवळ दोनच मृतदेह हस्तगत झाल्याची माहिती संघटनेने दिली.