|Sunday, November 18, 2018
You are here: Home » क्रिडा » आफ्रिदी, गेल आयकॉन क्रिकेटपटू

आफ्रिदी, गेल आयकॉन क्रिकेटपटू 

वृत्तसंस्था/ काबुल

5 ऑक्टोबरपासून खेळविल्या जाणाऱया पहिल्या अफगाणिस्तान प्रिमियर लीग स्पर्धेसाठी सहभागी होणाऱया विविध संघांच्या फ्रांचायजीनी पाकचा शाहीद आफ्रिदी, विंडीजचा ख्रिस गेल, अफगाणचा रशीद खान, न्यूझीलंडचा ब्रेंडॉन मेकॉलम आणि आंद्रे रसेल यांना आयकॉन क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अफगाणमध्ये प्रथमच होणाऱया या स्पर्धेत पाच संघांचा समावेश आहे. पकतिया, काबुल, बालेख, कंदहार आणि नांगरहार येथील संघ सहभागी होत आहेत. या प्रत्येक संघांमध्ये पाच विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश राहील. 17 दिवस चालणाऱया या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय विदेशी क्रिकेटपटू ख्रिस जॉर्डन, टी. परेरा, राँची, पार्नेल, मुनेरो, बोपारा, मॅक्लेनगेन, एम. रहीम, मोहम्मद हाफीज, बेन कटींग, वहाब रियाज यांचा समावेश आहे.

 

Related posts: