|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कलाकारांमध्ये भाषावाद नसतो

कलाकारांमध्ये भाषावाद नसतो 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कलाकारांमध्ये कसलाही भाषावाद किंवा सीमावाद नसतो. देशात अनेकजन याविषयी लढताना दिसतात. पण कलाकार म्हणून पाहिल्यास असा वाद व्यर्थ  ठरतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. निलम बेळगांवकर स्मृती पुरस्काराप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देवल क्लब येथे रविवारी हा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर, सुरेखा शहा, डॉ. अभिजीत देवधर यांनी  मनोगत व्यक्त केले. तसेच यांच्या हस्ते सुरेश चौगले, दिलीप माळी, वत्सला देशमुख, कुंडलिक चितगुळ यांना निलम बेळगांवकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बेळगांवकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Related posts: