|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षपदी सुंदरराव देसाई

खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षपदी सुंदरराव देसाई 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी सुंदर देसाई यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश चौगुले यांची निवड करण्यात आली. संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेत  नूतन कार्यकरणीची निवड झाली. तसेच खजिनदार सदाशिव पाटील, सचिव एस. एस. तुपद व तज्ञ संचालक दादासाहेब जगताप, सदस्यांचीही यावेळी निवड करण्यात आली.

   खादी ग्रामोद्योग संघातर्फे 150 व्या महात्मा गांधी जयंती अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील हायस्कूल, महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गांधी वाड्.मय व खादी विक्रिचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महात्मा गांधी अभ्यास केंद्रात एन. सी. सी विद्यार्थी व महिलांसाठी चरखा सूतकताई ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून खादी प्रचार, विक्री व गांधीजींचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविले जाणार आहे.  तसेच 2 आक्टोंबरला गांधी जयंती सप्ताह निमित्ताने नूतन खादी भांडाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सर्वांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष देसाई यांनी केले आहे.