|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रा. रामचंद्र कुंभार यांना पीएच. डी. प्रदान

प्रा. रामचंद्र कुंभार यांना पीएच. डी. प्रदान 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

प्रा. रामचंद्र कुंभार यांना शिवाजी विद्यापीठातील इतिहास विषयातील पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘20 व्या शतकातील कोल्हापूर जिल्हय़ातील कुंभार समुदाय एक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला आहे. या विषयासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. माधव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ते सध्या रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. पीएच. डी. प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्रा. कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर, डॉ. अवनीश पाटील, बळवंत कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला शहा, इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रतापसिंह माने आदींचे सहकार्य लाभले.