|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यापीठ हायस्कूलने समाज घडवला

विद्यापीठ हायस्कूलने समाज घडवला 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात विद्यापीठ हायस्कूलने निव्वळ विद्यार्थी घडवण्याचेच काम केले नाही, तर समाज घडविण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ऍड. धनंजय पठाडे यांनी केले.

विद्यापीठ हायस्कूलच्या 101 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरवण्यात आले.

ऍड. पठाडे म्हणाले, विद्यापीठ हायस्कूलच्या स्थापनेला 101 वर्षे पूर्ण झाली. ऐवढया वर्षात या संस्थेतील विद्यार्थी मोठ-मोठया पदावर कार्यरत आहेत. नुसते शिक्षणच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राचे शिक्षण देवून, या संस्थेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपला आहे, असे सांगत, त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मुख्याध्यापक बी. डी. कुंभार यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. डी. व्ही. केसरकर यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक एस. वाय. कुंभार यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष विकास जोशी, विजयकांत नगरशेठ, अजयसिंह चिले, प्रदीप मगदूम यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: