|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खासदार राजु शेट्टी यांच्या बदनामीचे प्रस्थापितांचे षडयंत्र : जालंदर पाटील

खासदार राजु शेट्टी यांच्या बदनामीचे प्रस्थापितांचे षडयंत्र : जालंदर पाटील 

   प्रतिनिधी/   पेठवडगाव

 वडगाव शहरात स्वाभिमानीच्या नाराज कार्यकर्त्यांचा मेळावा हे प्रस्थापितांचे खासदार राजु शेट्टी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. हे षडयंत्र कोणाचे आहे त्याचा खासदार शेट्टी हे योग्य वेळी स्फोट करतील मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या षडयंत्राला बळी पडू नये. खासदार शेट्टी हे कधीच जातीयवादी वागले नाहीत हे त्यांनी विविध समाजातील कार्यकर्त्यांना दिलेल्या विविध पदावरून स्पष्ट होते. नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू अशी भूमिका स्वाभिमानी पक्षाचे प्रा.जालंदर पाटील व स्वाभामिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी पेठ वडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यावेळी बोलताना जालिंदर पाटील म्हणाले, शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी लढणाऱया खासदार शेट्टी यांच्यावर अनेक बिनबुडाचे आरोप होत आहेत. काहीजण त्यांनी जमिनी घेतल्याचा आरोप करत आहेत, आरोप करणाऱयांनी त्यांचा सातबारा दाखवा. शेतकर्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे उसाला दर मिळाला. शेतकऱयाला त्याच्या घामच दाम मिळाल. शेट्टी यांच्यावर जातीयवादाचा आरोप करणार्यांनी त्यांनी दिलेली पदे कोणाला दिली आहेत ते तपासावे. सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, भगवान काटे असोत अशी अनेक उदाहरणे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडणाऱयांनी एक काम करावे त्यांनी दुसरे राजु शेट्टी व्हावे त्यांनी सवता सुभा मांडून शेतकर्यांच्या प्रश्नासाठी लढावे परंतु प्रस्थापितांच्या षडयंत्राचे बळी ठरून आपले नुकसान करून घेवू नये. तुमचा राजकारणासाठी वापर होऊ देवू नका असे आवाहन प्रा. जालंदर पाटील यांनी यावेळी केले.

संघटनेत काम करत असताना काही चुका झाल्या असतील. घरातील भांडण घरात सोडवू अजूनही आम्ही नाराज असलेले शिवाजीराव माने आणि त्यांच्या बरोबर असलेले कार्यकर्ते यांची समजूत काढू, योग्य त्या सुधारणा करू मात्र शेतकर्यांची चळवळ मोडीत काढण्याचा असलेला डाव या कार्यकर्त्यांनी ओळखावा असे आवाहन भगवान काटे यावेळी केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे, हातकणंगले आप्पा येडके, खोचीचे शिवाजी पाटील, संतोष जाधव,सत्वशील जाधव,संपत पवार, हरिभाऊ जाधव, सुनिल पचिबरे, हनमंत हावलदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: