|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कोथळे खून : सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर

कोथळे खून : सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर 

प्रतिनिधी/ सांगली

अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणातील पुरवणी दोषारोप पत्र दाखल करुन मंगळवारी संशयितांवर आरोप निश्चितीकरणाची प्रक्रिया होणार होती. परंतु सुनावणीच पुढे गेल्याने आता ही प्रक्रिया 25 सप्टेंबरच्या सुनावणीवेळी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अमानुष मारहाण करून अनिकेत कोथळे या युवकाचा  खून करण्यात आला होता. त्यानंतर तो युवक कोठडीतून पळुन गेल्याचा बनाव करत त्याचा मृतदेह आंबोली घाटातील जंगलात नेऊन जाळला होता. ही घटना सहा नोव्हेंबर 2017 रोजी रात्री घडली होती. या प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सोमवारी संशयीतांना न्यायालयात  भेटवण्यात आले होते. त्यावेळी युवराज कामटे याने दोषारोपपत्रात परस्पर बदल होण्याची भीती व्यक्त करताना थेट कोर्टावरच अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्या या उद्दामपणाचा न्यायालयाने चांगलाच समाचार घेत त्याला कडक शब्दात सुनावले होते. त्याचवेळी या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता ही सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related posts: