|Thursday, September 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सर्व गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा – साळोखे

सर्व गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा – साळोखे 

वार्ताहर/ बोरगाव

गणपती उत्सवात 75 टक्के रस्ते रिकामे ठेवावेत. 2002 च्या नियमानुसार ध्वनि प्रदूषण टाळण्यासाठी 50 ते 55 टक्के स्पिकरचा आवाज ठेवण्यात व्यावा. सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. कोणत्याही गणेश मंडळाकडून डॉल्बीचा वापर करू नये. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून गणेश उत्सव शांततेत पार पाडावा, असे मत इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी व्यक्त केले.

   बोरगाव येथील ग्रामपंचायती मध्ये गावातील सर्व गणेश मंडळांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, सरपंच जयंती पाटील, उपसरपंच प्रमोद शिंदे, पोलीस पाटील पद्मश्री गिरीगोसावी प्रमुख उपस्थित होते.

    यावेळी साळोखे म्हणाले, सर्व गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे व त्यानंतर पोलीस स्टेशनकडे रजिस्ट्रेशन करावे. तसेच ग्रामपंचायतीची, जागा मालकाची, एम एस सी बी ची परवानगी घेणे गरजेचे आहे. तरच मंडळ स्थापनेला परवानगी देण्यात येईल.तसेच सर्व मंडळांनी आपले देखावे वादग्रस्त विषयावरती नसावेत याची काळजी घ्यावी.

    तसेच मंडळांनी 10 दिवसाच्या कार्यक्रमाची यादी पोलीस स्टेशनला देणे आणि जबरदस्ती कोणाकडूनही वर्गणी वसूल करू नये. अन्यथा त्या मंडळावरती कारवाई करण्यात येईल. तसेच प्राथमिक स्वरूपात या उत्सवा दरम्यान मोठमोठय़ा आवाजातील वाद्यांचा वापर केला जातो. तो मोठा अपायकारक असून मोठय़ा आवाजातील आधुनिक वाद्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा धोका मोठय़ा प्रमाणात तयार होत. असून यामुळे अनेक आबालवृद्धांना याचा शारीरिक  व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शासनाने वाद्यांच्या आवाजावरती 50 डेसिबलच्या वरती आवाज असणाऱया मंडळावरती कारवाई करण्यात येईल, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे सर्व गणेश उत्सव सर्वांनी डॉल्बीमुक्त स्वरूपात साजरा करावा. यावेळी इस्लामपूर ठाणे अंमलदार ए पी पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रणधीर पाटील, शंकर पाटील, आनंदराव पाटील, सुनील पाटील, डॉ.नरसिंह देशमुख डॉ.गजानन भालेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई, सूर्यकांत पाटील, शकील मुल्ला, मालोजी पाटील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: