|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तानाजीराव पाटील यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद

तानाजीराव पाटील यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद 

प्रतिनिधी/ आटपाडी

श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेने ग्रामीण भागात दर्जेदार सुविधांसह शैक्षणिक संकुल उभारून वेगळेपण जतन केले आहे. कोणत्याही प्रकारचे महाविद्यालयाला अनुदान नसतानाही अनुदानप्राप्त महाविद्यालयांपेक्षाही संस्थेने विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील हे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.

आटपाडीतील श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयाला कुलगुरूंनी सदिच्छा भेट देवुन संस्थाचालक, प्राचाय, प्राध्यापकांशी संवाद साधताना ही भावना व्यक्त केली. कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापुर जिल्हय़ातील महाविद्यालयांना भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत त्यांनी आटपाडीतील महाविद्यालयांच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला.

संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, प्र.प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार, प्र.प्राचार्य राजु कोकरे, प्रा.बी.एस.कदम, प्रा.धनाजी गायकवाड, डॉ.रामदास नाईकनवरे, प्रा.भारती देशमुखे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे कुलगुरूंचे स्वागत करण्यात आले. श्रीराम संस्थेच्या शैक्षणिक दालनासह गुणवत्तापुर्ण वाटचालीची माहिती अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी दिली.

महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त करतानाच नाविन्यपुर्ण संशोधनात्मक कार्यातही ठसा उमटविला आहे. ज्यु.कॉलेज, शिक्षणशास्त्र महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक दालनाव्दारे ज्ञानदानाचे अविरत कार्य संस्था व शिक्षक करताहेत. या सर्वांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी शिक्षण संस्थांसह प्राध्यापकांचे योगदान महत्त्वपुर्ण असल्याची भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली.

Related posts: