|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गोवर व रूबेला लसीकरणचा फायदा पालकांनी घ्यावा

गोवर व रूबेला लसीकरणचा फायदा पालकांनी घ्यावा 

 

प्रतिनिधी/ जत

सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तालुकास्तरावरती गोवर व रूबेला लसीकरण मोहीम आयोजित केली असून या मोहीमेचा तालुक्यातील पालकांनी आपल्या मुलांसाठी फायदा करून घ्यावा असे आवाहन सांगली जिल्ह परिषदेचे आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात गोवर लसीकरण मोहीम 2018 तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जत पंचायत समितीच्या सभापती सौ. मंगलताई जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, डॉ. रवींद्र आरळी, गटविकास अधिकारी सौ. अर्चना वाघमळे, सौ. श्रीदेवी जावीर, डॉ. विवेक पाटील, तालुका वैद्यकीय डी. जी. पवार, डॉ. नलिनी पवार, डॉ. काजोल श्रीवास्तव, डॉ. विद्याधर पाटील, डॉ. बी. टी. पवार, डॉ. अभिजीत पवार, डॉ. नांद्रेकर, डॉ. प्रमोद कांबळे, आर. डी. शिंदे, गौस खतिब आदि उपस्थित होते.

यावळी बोलताना आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील म्हणाले की, म्लनालेकी गोवर व रूबेला लसीकरण अत्यंत महत्वाची असून हि लस न घेतल्यामुळे पन्नास हजार मुले भारतात दर वर्षी दगावतात. याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शेतकऱयांच्या दारापर्यंत ही लसीकरण मोहीम राबविली असून याचा फायदा जत तालुक्यातील पालकांनी आपल्या मुलांसाठी करून घ्यावा असे आवाहन केले. डॉ. रवींद आरळी म्हणाले जत तालुक्यातील मुलांच्या पर्यंत आरोग्य विभागाने ही लस पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. डी. जी. पवार यांनी केले.

 

 

 

 

Related posts: