|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कर्जबाजारीला कंटाळून पोगरवाडीच्या युवकाची आत्महत्या

कर्जबाजारीला कंटाळून पोगरवाडीच्या युवकाची आत्महत्या 

वार्ताहर/ परळी

प्रवीण रामदास घोरपडे (वय 32 रा. पोगरवाडी) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेती फवारणीसाठी आणलेल्या औषधाचे प्रशान केले. रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडल्याने खाजगी वाहनाच्या सहाय्याने प्रवीण घोरपडे यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालय येथे दाखल केले, परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 प्रवीण घोरपडे यांच्या वडिलांचे काही दिवसापूर्वी अपघात झाला आणि त्यांच्या उपचारासाठी कर्ज काढले होते. घरातील कर्ता पुरूष ते होते, परंतु प्रमुख व्यवसाय शेती आणि घरातील सदस्य संख्या यांमुळे कर्ज हे वाढतच होते. याच कर्जबाजारीपणामुळे तसेच घरातील तणावग्रस्त वातावणामुळे प्रवीण रामदास घोरपडे यांनी सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान फवारणीसाठी आणलेले औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात 7 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची एक मुलगी, पत्नी, वडील, आई असा मोठा परिवार आहे. प्रवीण घोरपडे यांच्या निधनांने पोरवाडीसह परळीभागात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related posts: