|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा तार नदीवरील पुलाचे उद्घाटन

म्हापसा तार नदीवरील पुलाचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा तार नदीच्या पात्रावर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, उपनगराध्यक्ष मर्लिन डिसोझा, बस्तोडा सरपंच सावियो मार्टिन्स, अभियंता वेर्लेकर, मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर व पंच, नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान या पुलाचे काही काम अद्याप बाकी आहे. चतुर्थीच्या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये हे लक्षात घेऊन या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे ये जा करण्यास वाहतूकदारांना सोयीचे होईल, अशी माहिती  आमदार ग्लेन टिकलो यांनी दिली.

या पुलासाठी 300 कोटी रुपये खर्च आला आहे. सदर काम मेसर्स आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ने हाती घेतले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या पुलाचे रितसर उद्घाटन डिसेंबर महिन्याच्या अखेरिस करण्यात येईल, अशी माहिती मंत्री ढवळीकर बोलताना दिली.

बॉक्स

मुख्यमंत्र्यांनी आपले पद सोडण्याची गरज नाही

 सरकारच्या मंत्रीमंडळात सहा अनुभवी मंत्री आहेत. त्यांना सरकारी कामकाज हाताळण्याचा अनुभव आहे. शिवाय विविध खाती योग्यरित्या हाताळू शकतात. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले पद सोडण्याची गरज नाही. आम्ही सर्वानुमते एकत्रित योग्यरित्या सरकार चालवू शकतो. विरोधकांनी नाहक चलबिचल होऊ नये, असे मंत्री ढवळीकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

21 उमेदवारांना निवडून द्या

आपण कुठलेही सरकार आले तरी तुम्ही त्यांना पाठिंबा देतात. आता तुम्ही मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेत आहात. तुम्ही त्यास राजी आहात काय असा प्रश्न पत्रकारांनी ढवळीकर यांना केला असता ते म्हणाले, जनतेने 1 उमेदवारांना निवडून द्यावे. जेणेकरून आपण मुख्यमंत्री होण्यात राजी होईन, असा टोला त्यांनी मारला.

Related posts: