|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडण्यात मोटीळीचा बाजार फुलला

पेडण्यात मोटीळीचा बाजार फुलला 

प्रतिनिधी/ पेडणे

मांगल्याचा संदेश घेऊन येणारा गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने श्रीगणेशाच्या स्वागतासाठी लगबग सुरु असून पेडणे बाजारपेठ गणेशाच्या पूजा साहित्य, मिठाई, किराणामाल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, माटोळी साहित्य यांनी बाजारपेठ फुलली आहे.

गोमंतकीयांचा सर्वात मोठा सण असलेल्या चतुर्थी उत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात उत्सव दरम्यान खरेदी होत असते. ही खरेदी चतुर्थी अगोदर सर्व भाविक मोठय़ा प्रमाणात करतात.

पेडणे बाजारापेठेत विविध प्रकारचे माटोळी साहित्य दाखल

पेडणे बाजारपेठेत पालिका समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूला मोटोळीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी विक्रेते आज मोठय़ा प्रमाणात आले.

माटोळीसाठी लागणाऱया वस्तू त्यात रानातील कात्रे, कवठळे, फोपळीचे, नारळीची पेंड, कांगले, माटोळीसाठी बांधण्यात वापरले जाणारे दोर, तसेच विविध प्रकारच्या गावठी भाज्या आदी साहित्य मोठय़ा प्रमाणात दाखल झाले.

दुकाने सजली

  चतुर्थी सणासाठी गरीब मुनष्यसुद्धा आपल्या कुवतीनुसार खरेदी करत असतो. त्यासाठी त्याला भावी काळात पैशांची चणचण भासणार याचा मुळीच विचार भक्तगण करत नाही. दुकानावर असलेल्या विविध वस्तू, गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, गणपतीची आरस यासाठी लागणारे साहित्य मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत आले असून या साहित्याने दुकाने सजली आहेत.

गणपती मुर्तीकार यांचा (शेवटचा दिवस) महत्त्वाचा

गणपती मूर्तीकारांसाठी बुधवार हा शेवटचा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी पूर्णदिवस व रात्री ते काम करतात काहीजण जवळचित्र शाळा असल्याने आपल्या मूर्त्या बुधवारी घेऊन जातात. तर लांब पल्यांच्या चित्रशाळैत ज्यांनी आपल्या मूर्त्यां बनविण्यासाठी दिल्या ते दोन दिवस अगोदर गणपती घरी घेऊन जातात. त्यामुळे बहुतेक चित्रशाळेतील गणपती हे बुधवारीच घरी नेले जातात. मूर्तीकारांकडून नियोजित वेळेतच काम हातावेगळे करण्याचे प्रयत्न होत असतात. मूर्तीकारांसाठी वेळेचे बंधन खूप महत्त्वाचे असते. यासाठी ते आधी दोन दिवस गणपतीमूर्ती पूर्णपणे तयार ठेवतात.

पर्यावरणपूरक इको प्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकजणांचा कल

गणेश उत्सवादरम्यान मोठय़ा प्रमाणात प्रदुषण विरहीत वातावरण होते. या उत्सवादरम्यान फटाके, तसेच विविध प्रकारच्या प्लास्टिक गोष्टींचा वापर होत असतो. मात्र गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक इको पेंडली गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमातून जनजागृती होत असते. वृत्तपत्रे, सोशल मिडिया एनजीयो विविध संस्था आदी माध्यमाद्वारे पर्यावरणाचे रक्षण करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जाते. या आवाहनाला आता सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत असून भाविक व भक्तगणाचा कल आता प्लास्टिकमुक्त तसेच पर्यावरणपुरक गणपती उत्सव साजरा करण्याकडे झुकलेला आहे हे दिसून येते.

चतुर्थी काळात मोठय़ा प्रमाणात खर्च

चतुर्थी एकमेव सण गोमतकात असा साजरा केला जातो त्यावर प्रत्येक घरात किमान हजारो रुपयांची खरेदी केली जाते. नवीन कपडे, घराला रंगरंगोटी, स्वच्छता विविध प्रकारची कडधान्ये, वस्तू, करंज्या, विविध प्रकारची मिठाई, सजावटीसाठी लागणारे साहित्य यावर प्रत्येक घरातून हजारो रुपये खर्च केले जातात.

शहरी भागातील नागरीक गावात येतात

शहरी भागात विविध ठिकाणी तसेच दुसऱया राज्यात नोकरी तसेच व्यवसायानिमित्त असलेले सर्वजण चतुर्थीला न चुकता आपल्या गावी येतात. त्यामुळे गावात एक उत्साही आणि चैतन्यमय वातावरण चतुर्थी दरम्यान, पाहायला मिळते

Related posts: