|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मूर्ती तयार करण्यास साचावर अवलंबून न राहणारे मदन हरमलकर

मूर्ती तयार करण्यास साचावर अवलंबून न राहणारे मदन हरमलकर 

प्रतिनिधी/ पणजी

गणेश चतुर्थीला आता एकच दिवस राहीला असून प्रत्येकजण आपल्या कामात गुंतलेला आपल्याला सापडणार. ज्याप्रमाणे आपण घरी सजावट करण्यासाठी व्यस्त असतो त्याचप्रमाणे चित्रशाळांमध्ये मुर्तीकलाकारांच्या कामालाही वेग आला आहे. विविध रंगांचा वापर करून मुर्ती आकर्षक दिसण्यासाठी कलाकारांचेही प्रयत्न चालू आहे. प्रत्येकाचे एक वैशिष्टय़ असते व त्यामुळेच त्याची समाजात ओळख असते. मांद्रे येथील मदन हरमलकर हे मुर्ती करण्यासाठी साचावर अवलंबून राहत नसल्याने त्यांनी तयार केलेल्या प्रत्येक मुर्तीत जीवंतपणा जाणवतो.

कला ही शिकून येत नाही तर ती आपल्या अंगी असावी लागते. त्यासाठी शिक्षण घेण्याचीही गरज लागत नाही. मांद्रे येथील गणपतीची मुर्ती तसेच चित्र तयार करणारे मुर्तीकार मदन हरमलकर यांनी कुठेच मुर्तीकलेचे शिक्षण घेतले नाही. त्यांचे आजोबा कृष्णा हरमलकर हे कलाकार असून त्यांनी फ्ढार कमी मुर्ती प्रथम करून सुरुवात केली. त्यानंतर ही परंपरा वडील बाबुराव हरमलकर यांनी तर आज मदन हरमलकर यांनी जोपासली. बऱयाचदा मुर्ती तयार करण्यासाठी साच्याचा आधार घेतला जातो पण हरमलकर यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते साचावर अवलंबून नसून हव्या त्या आकाराची हवी तेवढी मुर्ती ते सहज तयार करून देतात.

मदन हरमलकर यांच्या आजोबांनी 35 वर्षापूर्वी या चित्रशाळेची सुरुवात केली होती. घरात मुर्ती तयार होत असताना पाहून त्यात मन रमवून आपणही ही कला शिकावी असे लहान मुलाला वाटणे सहाजिकच होते. हरमलकर यांनी वयाच्या 8व्या वर्षी शाडूच्या मातीची मुर्ती तयार करण्यास आपले योगदान देण्यास सुरुवात केले. आज प्रथम लहान स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या या चित्रशाळेत दरवर्षी मुर्तींच्या संखेते वाढ होत आहे. एवढेच नाही तर सार्वजनिक मुर्तीही चित्रशाळेत तयार करण्यात येतात. गोव्यात सर्वत्र हरमलकर यांच्या मूर्ती जात असून सांगे तालुक्यात त्यांनी तयार केलेल्या मुर्ती मोठय़ाप्रमाणात नेण्यात येतात.