|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हरीश मेलवानीच्या कार्यालयावर छापा

हरीश मेलवानीच्या कार्यालयावर छापा 

बेकायदा खाण प्रकरण महत्वाचे दस्तावेज ताब्यात

प्रतिनिधी/ पणजी

खाणमालक हरीश मेलवानी यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱयांनी काल मंगळवारी छापा टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणी काही खाण मालकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून त्यात मेलवानी यांच्या नावाचाही समावेश आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱयांनी सकाळी 10 वाजता सुरू केलेली कारवाई संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होती. कार्यालयात तसेच घरातही प्रत्येक दस्तावेज पडताळून पाहिला जात होता. खाण व्यवहारातील सर्व फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

पाच वर्षांतील कागदपत्रे जप्त

गोव्यातील सर्व खाणींचे लीज 2007 मध्ये संपुष्टात आले, तरी 2012 पर्यंत 5 वर्षे या खाणी बेकायदेशीररित्या चालू राहिल्या होत्या. या पाच वर्षांच्या काळातील खाण व्यवहाराचा दस्तावेज खास करून जप्त करण्यात आला आहे.

सर्व माहितीची होणार छाननी

चार्टर्ड अकाऊंटन्टद्वारा तयार करण्यात आलेला अहवाल तथा खाण खात्याकडे सादर केलेला तपशील, निर्यात झालेल्या खनिजाचा मुरगाव पोर्टकडे सादर केलेला तपशील, त्या खनिजासंबंधी झालेला व्यवहार. खनिज विकत घेणाऱयाने पाठवलेली रक्कम असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून शिस्तबद्ध पद्धतीने पोलिसांनी दस्तावेज ताब्यात घेतला आहे.

जो दस्तावेज ताब्यात घेण्यात आला त्याची सूची बनवून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्याची प्रत खाणमालकाला द्यावी लागली. या प्रक्रियेत उशीर झाला. अन्यथा सदर छापा किरकोळ स्वरुपाचा होता. तो तपास यंत्रणेच्या दैनंदिन कामाचा भाग होता, असे अधिकाऱयांनी सांगितले.