|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाजारपेठेचा सुट्टीचा दिवस ठरला गर्दीचा

बाजारपेठेचा सुट्टीचा दिवस ठरला गर्दीचा 

बेळगाव / प्रतिनिधी

मंगळवार हा एरवी शहराच्या बाजारपेठेचा सुटीचा दिवस. परंतु गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लोटलेल्या प्रचंड गर्दीने हे चित्र पालटून टाकले. मंगळवार असूनही बाजारपेठेतील प्रचंड गर्दीने उत्सवाच्या उत्साही वातावरणाचे प्रतिबिंब उमटले होते. सोमवारी बंद मुळे खरेदीकडे कमी प्रमाणात वळलेल्या असंख्य भक्तांनी मंगळवारी मात्र खरेदीचा पुरेपूर आनंद लुटला.

गुरूवारी श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. त्यामुळे बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश भक्तांच्या पूर्व तयारीला वेग आला आहे. आवश्यक सामग्रीच्या खरेदीसाठी भक्तांनी मोठय़ा संख्येने बाजारपेठेत गर्दी केली होती. खडेबाजार, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड, मार्केट, नरगुंदकर भावे चौक या ठिकाणी येणाऱया गर्दीने रस्ते फुलुन गेले होते. बाल चमुसह ज्ये÷ांचा उत्साह देखील अवर्णनीय असा होता. सजावट साहित्य, पुजा साहित्य, फळफळावळे आणि कपडय़ांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ दिवसभर टिकून होता. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणाऱया विपेत्यांना ही पर्वणी लाभली होती. रात्री उशीरापर्यंत भक्तांचा संचार सुरू होता.

चौकट

हेस्कॉमच्या कारभारामुळे संताप

मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी होणार याची शक्मयता गृहीत धरून हेस्कॉमने या भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे होते. परंतु तातडीचे दुरूस्ती काम हाती घेतल्याचे निमित्त पुढे करून हेस्कॉमने शहराच्या नेमक्मया याच भागातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. या प्रकाराने नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ऐन सणासुदीच्या दिवसात हेस्कॉमकडून असा अनागेंदी कारभार झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.