|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्वामी विवेकानंदांचे भाषण अजरामर

स्वामी विवेकानंदांचे भाषण अजरामर 

बेळगाव / प्रतिनिधी

शिकागो येथे भरविण्यात आलेल्या जागतीक परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी जे भाषण केले ते सदैव अजरामर राहील. भाषणाच्या सुरवातीलाच बंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगाला दिला. त्यांनी आपल्या बुद्धीकौशल्यातून जगाला भारतीय संस्कृतीचा आदर्श दाखवून दिला. स्वामी विवेकानंदाच्या भाषणाची माहिती स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा बेळगाव यांच्यातर्फे आयोजिलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजिलेल्या कार्यक्रमात वक्ते म्हणून लाभलेले प्रज्ञा प्रवाह संस्थेचे रघुनंदजी यावेळी बोलत होते. सदर कार्यक्रम आयएमईआर सभागृह येथे पार पडला.

कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद, भारत माता यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर आरती कुलकर्णी, प्रजा प्रवाह संस्थेचे रघुनंदजी, रामकृष्ण जाधव, किशोर काकडे. आदी उपस्थित होते. यावेळी आनंद अरळीकट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमप्रसंगी निधी केळकर, प्रा. संदीप नायर, श्रोते, मान्यवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता किशोर काकडे यांनी वंदे मात्रम गाऊन केली.

Related posts: