|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार फोडून लांबविला डेक

कार फोडून लांबविला डेक 

प्रतिनिधी/ बेळगाव

आनंदनगर, वडगाव येथे घरासमोर लावलेली ओमनी कार फोडून आतमधील साऊंड सिस्टीम असलेला डेक लांबविण्यात आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत मुचंडी यांच्या कारच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. वसंत यांनी आपल्या घरासमोर ही कार उभी केली होती. पाठीमागील स्लायडिंग काच उघडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला असून डेक काढून घेताना तोडफोड झाली आहे. यामुळे नुकसानही झाले आहे.

Related posts: