|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बस कारची समोरासमोर धडक

बस कारची समोरासमोर धडक 

वार्ताहर / उचगाव

बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर राकसकोप फाटय़ानजीक बस व कारची समोरासमोर धडक होऊन कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता घडली.

मल्लाप्पा बाबू पुन्नाजीचे असे जखमी चालकाचे नाव आहे.

उचगाव येथील निवृत्त जवान मल्लाप्पा पुन्नाजीचे हे ओमणी कारमधून (केए 22 झेड 5745) बेळगावहून उचगावकडे जात असताना देवगड डेपोची महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस क्र. एमएच. 20 बीएल 1216 ही बस बेळगावाकडे येत होती. राकसकोप फाटय़ानजीक या कार व बसमध्ये समोरासमोर टक्कर होऊन कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये कार चालक मल्लाप्पा गंभीर जखमी झाला असून त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा काकती पोलिसांनी केला.

खड्डय़ांमुळे अपघात

बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. राकसकोप फाटय़ानजीक रस्ता खूप खराब झाला आहे. सदर खड्डे चुकवताना हा अपघात झाला असावा, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा रास्तारोको करू, असा इशारा वाहनधारकांनी दिला आहे.

Related posts: