|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांचा आगमन सोहळा

बाप्पांचा आगमन सोहळा 

प्रतिनिधी / बेळगाव

गणरायांचे स्वागत करण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काही मंडळांच्या गणरायांचे आगमन आधी दोन दिवस होत आहे. कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने 18 फूट उंच गणेशमूर्तीची प्रति÷ापना करण्यात येणार असून मोठय़ा उत्साहाने गणरायाचे स्वागत करण्यात आले.

शहरात आता गणेशचतुर्थीच्या आधी दोन दिवस गणरायांचा आगमन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. शहरात बहुतांश मंडळांच्या गणरायांचे आगमन आधी दोन दिवस होत आहे. कपिलेश्वर रोड येथील मंडळाकडून यंदा 18 फुटी गणेशमूर्तीची प्रति÷ापना करण्यात येत आहे. गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी गणरायाची मूर्ती मंगळवारी नेण्यात आली. यावेळी बापट गल्ली येथील मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी ही गणेशमूर्ती साकारली असून मंगळवारी सकाळी मूर्ती धर्मवीर संभाजी चौक येथे ठेवण्यात आली. त्यानंतर सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक ते कपिलेश्वर मंदिरपर्यंत मिरवणुकीने गणेशमूर्ती नेण्यात आली. झांजपथकाच्या गजरात गणरायांचा आगमन सोहळा साजरा करण्यात आला. महाद्वार रोड व कपिलेश्वर रोड परिसरातील महिला, मुले आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक पेहराव करून ढोल पथकाच्या गजरात गणेशमूर्ती नेण्यात आली. अकरा दिवस चालणाऱया उत्सवाची सुरुवात आगमन सोहळय़ाने झाली. यावेळी रामलिंगखिंड मार्गे, टिळक चौक, पाटील गल्ली आणि कपिलेश्वर उड्डाणपुलावरून आगमन सोहळय़ाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कपिलेश्वर मंदिराशेजारी असलेल्या मंडपामध्ये मूर्तीची प्रति÷ापना करण्यात येणार आहे.

Related posts: