|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सर्वात उंच तिरंगा पुन्हा फडकला

सर्वात उंच तिरंगा पुन्हा फडकला 

बेळगाव / प्रतिनिधी

किल्ला तलावाशेजारी उभारण्यात आलेला सर्वात उंच तिरंगा ध्वजाचा आकार कमी करण्यात आला आहे. पाऊस कमी झाल्याने तिरंगा आता पुन्हा मंगळवारी फडकविण्यात आला आहे. हा ध्वज कायमस्वरुपी राहणार आहे.

किल्ला तलाव येथे महानगरपालिकेच्यावतीने सर्वात उंच तिरंगा उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाची उंची 360 फूट असून, 120 बाय 80 फूट आकाराचा ध्वज फडकविण्यात आला होता. मात्र, पावसाळय़ात वाऱयाने हा ध्वज वारंवार खराब होत होता. पावसाच्या पाण्यामुळे ध्वजाचे कापड ओले होऊन वजन वाढत होते, हे धोकादायक होते. ध्वज उभारण्यात आल्यापासून तीन ध्वज खराब झाले. ते दुरूस्त करून फडकवण्यात आले होते. पण वाऱयामुळे पुन्हा खराब झाले. ध्वज उभारण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराने पाच ध्वज देण्याचा करार होता. मात्र ध्वज खराब झाल्याने दुरुस्त करण्याचेही काम लागले. ध्वजाची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. वारंवार ध्वज खराब झाल्याने ध्वजाचा अवमान होत आहे. यामुळे ध्वजाचा आकार कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. 80 बाय 60 फूट आकाराचा ध्वज फडकविण्यासाठी ध्वजसंहिता प्राधिकरणकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कमी आकाराचा तिरंगा फडकविण्यात आला आहे.  

 

Related posts: