|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » नागपूरात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

नागपूरात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / नागपूर :
घोटनागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (11 सप्टेंबर) रात्री अकराच्या सुमारास दत्तात्रयनगरात रवींद्र नागपुरे यांनी पत्नी मीना नागपुरे यांची गोळय़ा घालून हत्या केली. त्यानंतर रवींद्र यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरे दाम्पत्यामध्ये वाद सुरु होते. त्यामुळे दोघांचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरु होते. याच वादामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. काल साडेदहाच्या सुमारास रवींद्र नागपुरे दत्तात्रयनगरात त्यांची पत्नी राहत असलेल्या घरात भेटायला गेले. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर रवींद्र नागपुरे यांनी त्यांच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्लायवूडचा व्यापार करणाऱया रवींद्र नागपुरे यांची आर्थिक परिस्थिती गेल्या काही महिन्यात डळमळीत झाली होती. त्यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण होते.

Related posts: