|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » राफेल करारामुळे सामर्थ्य वाढणार : हवाईदल प्रमुख

राफेल करारामुळे सामर्थ्य वाढणार : हवाईदल प्रमुख 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राफेल करारावरुन काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच हवाई दलाच्या प्रमुखांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. मोदी सरकारच्या राफेल कराराचे समर्थन करतानाच राफेलमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडेल, असा दावा भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी केला आहे.बुधवारी दिल्लीत हवाईदलप्रमुख धनोआ यांनी एका कार्यक्रमात राफेल करारावर भाष्य केले. ते म्हणाले, जगात आपल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागणारे देश खूप कमी आहेत. आपल्या दोन्ही बाजूला अण्वस्त्रधरी देश आहेत. त्यातुलनेत आपल्याकडील शस्त्रसाठा अपुरा आहे. अशा परिस्थितीत राफेल विमानांमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात भरच पडेल, असे त्यांनी सांगितले.