|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » सकल मराठा समाज राजकीय पक्ष स्थापणार

सकल मराठा समाज राजकीय पक्ष स्थापणार 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर

आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन उभारणाऱया सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा देण्यात आली आहे. कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा शिवाजी पेठेतील शिवाजी मंदीर सभागृहात सुरु आहे.

मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. त्यामुळे आपल्या मागण्या राजकीय मार्गाने पूर्ण करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने जवळपास 58 मूकमोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.विविध मागण्यांसाठी मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आंदोलन केलं, तरीही त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा समाजाने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.