|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Automobiles » टाटाची नवी कार लाँच

टाटाची नवी कार लाँच 

 ऑनलाईन टिम / मुंबई :

टाटा मोटर्सला नवी ओळख देणाऱया टियागोने क्रॉस मॉडेल लाँच केले आहे. टाटा टियागो एनआरजी असे याचे नाव असुन सुरवातीच्या मॉडेलची किंमत 5.5 लाख तर टॉप मॉडेलची किंमत एक्स शोरूम 6.32 लाख रूपये आहे.

ही कार टियागोपेक्षा जास्त लांब, रूंद आणि ऊंच आहे. मात्र प्लेटफॉर्म सारखाच आहे. एनआरजीचा ग्राऊंड क्लिअरंस वाढवून 180 एम.एम करण्यात आला आहे. पेट्रोलमध्ये 1.2 लिटर, 3 सिलिंडर रिव्होंटरन इंजिन देण्यात आले आहे. जे 84 बीएचपी ताकद निर्माण करते. डिझेलमध्ये 1.05 लि. 3 सिलिंडर रिव्होटॉक इंजिन देण्यात आले असून ते 69 बीएचपी ताकद प्रदान करते. या इंजिनना 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे.

छोटय़ा कारच्या स्पर्धेत मागे पडलेल्या टाटा मोटर्सला टियागोने नवसंजीवनी दिली होती. एक वर्षातच टियागोने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे टाटाने टियागोचा सेदान टिगॉर कार बाजारात आणली होती. आता मारूतीच्या सेलेरिओची स्पर्धा करण्यासाठी टाटने टियागोचे एनआरजी रूप बाजारात आणले आहे.

 

 

 

Related posts: