|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गणपती पावला, हाकेला धावला

गणपती पावला, हाकेला धावला 

दात्यांच्या मदतीने जमीनदोस्त झालेले घर साकारले

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले-भुजनाकवाडी येथील एका गरीब महिलेला घर बांधण्यासाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाल्याने तिचे जमीनदोस्त झालेले घर पुन्हा उभे राहिले. मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते या महिलेला या घराचा ताबा देण्यात आला. याच घरात गुरुवारी गणपतीचेही पूजन होणार आहे.

भुजनाकवाडी येथील लक्ष्मी भास्कर म्हाडदळकर या गरीब महिलेचे घर दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या वादळी पावसात जमीनदोस्त झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना घर बांधणे अशक्मय होते. शहरातील काही सेवाभावी व्यक्तींनी म्हाडदळकर यांच्या मदतीसाठी आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत शहरातील सामाजिक कार्यकर्ते, देवस्थान, पक्षीय पदाधिकारी, भुजनाकवाडी मित्रमंडळ तसेच दानशूर व्यक्तींनी त्यांना आर्थिक व वस्तुरुपात मदत केली. त्यामुळे त्यांचे जमीनदोस्त झालेले घर पुन्हा उभे राहिले. मंगळवारी या पूर्ण झालेल्या घराचा ताबा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. यावेळी नगरसेवक श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, राजेश कांबळी, सुहास गवंडळकर, सुषमा प्रभूखानोलकर, गजानन किनळेकर, रमण किनळेकर आदी उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या अगोदर घर पूर्ण झाल्याने या घरात गणपतीचे पूजन होणार आहे.

Related posts: