|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » आयटी कंपन्यांकडून रोजगारनिर्मितीमध्ये वाढ

आयटी कंपन्यांकडून रोजगारनिर्मितीमध्ये वाढ 

गेल्या तीन वर्षातील उच्चांकी कामगिरी  

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठय़ा पाच सॉफ्टवेयर सेवा कंपन्यांकडून समाधानकारक रोजगारनिर्मिती करण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 24,047 कर्मचाऱयांची भरती करण्यात आली असून गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 13,772 कर्मचारी भरती झाली होती. टीसीएस, कॉग्निझंट, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक या कंपन्यांनी जून तिमाहीत सर्वाधिक कर्मचाऱयांची भरती केली.

या क्षेत्रात रोजगारनिर्मिती होण्याची तीन कारणे या क्षेत्रातील तज्ञांकडून सांगण्यात आली. पहिल्यांदा, देशातील या कंपन्या तंत्रज्ञानाची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याव्यतिरिक्त फॉर्च्युन 1000 कंपन्या आपला व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीचे विश्लेषण करत आहेत. आणि तिसरे कारण, कंपन्यांकडून डिजिटल तंत्रज्ञानावर करण्यात येणाऱया खर्चामध्ये वाढ करण्यात येत आहे. या कंपन्यांकडुन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईस्थित टीसीएसला डिसेंबरपासून तीन मोठी कंत्राटे मिळाली असून त्याच्या माध्यमातून 5.6 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळणार आहे. गेल्या आठवडय़ात बेंगळूरच्या विप्रोला 1.6 अब्ज डॉलर्सचे कंत्राट मिळाले होते. या कंपन्यांकडून डिजिटल तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त आयटी कंपन्या आता व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत. या पाच कंपन्यांकडून एकूण 1.17 दशलक्ष लोकांना रोजगार देण्यात येतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास पुन्हा वेगाने होत आहे. कंपन्यांनी डिजिटल क्षेत्रात भूतकाळात मोठा खर्च केला आहे. आता पारंपरिक व्यवसायाला गती मिळत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विश्लेषण क्षेत्रात मागणी वाढत आहे.

चालू आर्थिक वर्षात टीसीएसचा वेग 10 टक्क्यांवर पोहोचलण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षात डॉलर उत्पन्न 8.6 टक्क्यांनी वाढत 19.09 अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते. विप्रोचे उत्पन्न 8.06 अब्ज डॉलर्स होते.

Related posts: