|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » पेमेन्ट्स बँकांकडे 540 कोटीची ठेव

पेमेन्ट्स बँकांकडे 540 कोटीची ठेव 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या देशात कार्यरत असणाऱया चार पेमेन्ट्स बँकांमध्ये 540 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्याचे समजते. एअरटेल पेमेन्ट्स बँकेमध्ये सर्वाधिक रक्कम गोळा करण्यात आली आहे. एअरटेल पेमेन्ट्स बँकेकडे 307 कोटी, पेटीएम पेमेन्ट्स बँकेकडे 193 कोटी, फिनो पेमेन्ट्स बँक 38 कोटी आणि इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेकडे 1.4 कोटी रुपये जमा आहेत.

देशातील सर्व बँकांकडे साधारणपणे 115 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामानाने पेमेन्ट्स बँकांकडील ठेव केवळ 0.005 टक्के आहे. सध्याच्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पेटीएमकडून 3,500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामानाने सध्या त्यांच्याकडे 193 कोटी रुपये जमा आहेत. पंतप्रधान जनधन योजनेत 29 ऑगस्टपर्यंत 82 हजार कोटी रुपये जमा आहेत.