|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नोकरी बदलल्यानंतर आपोआप हस्तांतरित होणार पीएफ खाते

नोकरी बदलल्यानंतर आपोआप हस्तांतरित होणार पीएफ खाते 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या सदस्याने नोकरी बदलल्यानंतर त्याचे पीएफ खाते आपोआप हस्तांतरित होणार आहे. यासाठी त्याला आपल्या नवीन कंपनीला सर्व तपशीलबवर माहिती द्यावी लागणार आहे. ईपीएफओच्या सदस्यांना आता पीएफ खात्यातील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाईन ट्रान्स्फर प्रक्रियाही करावी लागणार नाही. पीएफ खात्यातील रक्कम आपोआप हस्तांतरित करण्यात येणार आहे.

कोणत्याही कर्मचाऱयाने नवीन आस्थापनात सहभागी झाल्यानंतर त्याला कंपोझिट डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. याव्यतिरिक्त त्याला नवीन कंपनीमध्ये आपल्याविषयी माहिती द्यावी लागते. नवीन कंपनीकडून जुना युएएन आणि पीएफ खात्याचा क्रमांक मागविण्यात येतो. यानंतर नवीन कंपनी आपली माहिती कर्मचारी पोर्टलवर एन्टर करते आणि युएएन आधार आणि बँक खाते जोडण्यात आल्यास व मागील कंपनीकडून त्याला संमती देण्यात आल्यास पीएफ हस्तांतरणाची आपोआप प्रक्रिया सुरू होते. यामुळे जुन्या पीएफ खात्यातील पैसा नवीन खात्यामध्ये जमा होण्यास मदत होते. कर्मचाऱयाला ही माहिती एसएमएसद्वारे मिळते.