|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » उर्वरित आर्थिक वर्षात जीडीपीत घसरण

उर्वरित आर्थिक वर्षात जीडीपीत घसरण 

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 8.2 टक्के होता, मात्र पुढील तिमाहीत यामध्ये घसरण दिसून येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपनी क्रेडिट सुईसच्या मते, रुपयाची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे. जून तिमाहीत 8.2 टक्के हा विकास दर उत्साहजनक दिसून आला. मात्र त्यावर मागील आर्थिक वर्षाच्या आधाराचा प्रभाव आहे. जून तिमाहीचा विकास दर 2 वर्षांच्या उच्चांकावर असून 8.2 टक्के होता.

पीएमआयमध्ये कमी आल्याने हे स्पष्ट होण्यास मदत होते की पहिल्या तिमाहीत विकास दर उच्चांकी स्तरावर पोहोचेल, मात्र पुढे जात त्यामध्ये घसरण होईल.कमजोर रुपया आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती या दोन प्रमुख कारणांनी अर्थव्यवस्थेसमोर संकट उभे राहणार आहे, असे पेडिट सुईसने म्हटले.