|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिशपकडून ननवर बलात्कार : पोलीस

बिशपकडून ननवर बलात्कार : पोलीस 

प्रतिज्ञापत्राद्वारे दावा : निदर्शने सुरूच

वृत्तसंस्था/ कोट्टायम

 बिशप प्रँको मुलक्कलने ननवर बलात्कार केल्याचा दावा पेलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. प्रतिज्ञापत्रात वैद्यकीय अहवालाचा दाखला देत बिशपने पीडित ननवर अनेकदा बलात्कार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याचदरम्यान पीडितेने आरोपी बिशप मुलक्कलच्या विरोधात भारतातील व्हॅटिकनचे प्रतिनिधी जियामबटिस्टा दिक्वात्रो यांना पत्र लिहून गतिमान चौकशीची तसेच प्रँकोला पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

8 रोजी लिहिलेल्या 7 पानी पत्रात अत्यंत विस्तृत तसेच भावुक व्यथा पीडितेने नमूद केली आहे. कॅथोलिक चर्च केवळ बिशप आणि पाद्रींची चिंता करतो. कायद्यात महिला तसेच नन्सना न्याय मिळेल अशी कोणतीही तरतूद आहे का हे आम्ही जाणू इच्छितो? चर्चच्या मौनामुळे मला अपमानास्पद वाटू लागल्याचे पीडितेने पत्रात म्हटले आहे.

जे मी गमावले आहे, ते चर्च परत मला करू शकेल का, अशी विचारणा करत पीडितेने लैंगिक शोषण कधी झाले याची माहिती पत्रात नमूद केली. बिशपने नन आणि तिच्या समर्थकांना पैसे तसेच मालमत्तेचे आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे अगोदरच समोर आले आहे. बिशपने दुसऱया नन्ससोबत देखील असेच गैरवर्तन केल्याचा दावा पीडितेने केला आहे.

तर दुसरीकडे जालंधरचे बिशप प्रँको मुलक्कलवर बलात्काराचा आरोप करणारी नन, तिच्या कुटुंबीयांसमवेत अन्य नन्सनी कारवाईची मागणी लावून धरली आहे. पीडित नन आणि कुटंबीयांना जॉइंट ख्रिश्चन कौन्सिलने समर्थन दिले आहे. कौन्सिलने आरोपी बिशपला अटक व्हावी, या मागणीकरता निदर्शने चालविली आहेत.

Related posts: