|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा 15 पासून

स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा 15 पासून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोहिमेचा शुभारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छ भारत मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. या मोहिमेचे नाव ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ असेल. पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. 15 सप्टेंबर रोजी सुरू होणारी ही मोहीम 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 4 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर रोजीच पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली होती. या मोहिमेला लवकरच 4 वर्षे पूर्ण होतील.

 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष सुरू होणार आहे. तर 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नव्या मोहिमेस प्रारंभ होईल. याच दिनी पंतप्रधान मोदी स्वच्छता मोहिमेशी संबंधित लोकांना भेटणार आहेत. मोहिमेदरम्यान शाळा आणि शासकीय विभागांसोबतच लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती आणि सामाजिक संस्थांची स्वच्छतेतील भागीदारी निश्चित केली जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास संस्थेकडून या मोहिमेच्या कार्ययोजनेचा पूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे.

मोहिमेचा पूर्ण आराखडा….

? 15 रोजीच्या ‘स्वच्छता ही सेवा 2018’ कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी तसेच ख्यातनाम व्यक्ती सहभागी होतील.

?याचप्रकारे 16 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वच्छता सभेचे आयोजन आणि श्रमदानाद्वारे स्वच्छता कार्यांचे आयोजन केले जाणार आहे.

?17 रोजी ख्यातनाम व्यक्तींकडून श्रमदान केले जाईल. 22 रोजी रेल्वेकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे.

?24 रोजी कॉपोर्रेट आणि कंपन्यांच्या भागीदारीने श्रमदान, स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण यासारखी कामे हाती घेतली जाणार आहेत.

?25 रोजी स्वच्छ भारत मोहिमेच्या (ग्रामीण) अंतर्गत स्वइच्छेने श्रमदान करू शकणाऱया लोकांना प्रेरित केले जाणार आहे.

?29 रोजी हातमाग उद्योग, कारखाने आणि सहकारी बँकांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाईल.

Related posts: