|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पासवानांना जावयासोबत ‘दोन हात’ करावे लागणार

पासवानांना जावयासोबत ‘दोन हात’ करावे लागणार 

पासवानांना जावयासोबत‘दोन हात’ करावे लागणार

वृत्तसंस्था/ पाटणा

लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या विरोधात त्यांच्या जावयानेच शड्डू ठोकला आहे. राष्ट्रीय जनता दलात सामील झालेले पासवान यांचे जावई अनिल साधू यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पासवान कुटुंबीयांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास तयार असून पासवानांनी दलितांचा अपमान केल्याचा दावा साधू यांनी केला.

राजदने मला किंवा पत्नी आशा पासवान यांना उमेदवारी दिल्यास निश्चितपणे आम्ही पासवान कुटुंबाच्या विरोधात निवडणूक लढवू. पासवानांनी माझाच नव्हे तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचा अपमान केला आहे. दलित त्यांचे वेठबिगार नसल्याचे साधू म्हणाले.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत साधू यांनी लोजपच्या तिकिटावर बोचहा मतदारसंघात नशीब आजमाविले होते, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मार्च महिन्यात तेजस्वी यादव यांच्या एका सभेदरम्यान साधू यांनी राजदमध्ये प्रवेश केला होता.