|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जपानचे सरकार छेडणार उंदरांविरुद्ध युद्ध

जपानचे सरकार छेडणार उंदरांविरुद्ध युद्ध 

जगप्रसिद्ध मासळीबाजार काही दिवसांसाठी बंद राहणार

वृत्तसंस्था/ टोकियो

जपानच्या तोयोसू शहरातील जगप्रसिद्ध मासळीबाजार पुढील महिन्यापासून बंद होतोय. हा बाजार बंद झाल्यावर तेथील सरकारने उंदरांच्या विरोधात मोहीम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. या 83 वर्षे जुन्या जगातील सर्वात मोठय़ा मासळीबाजारात दररोज एक कोटी 40 लाखांची उलाढाल होते आणि यात 400 प्रकारचे सागरीखाद्य मिळतात. बाजार 5 दिवसांसाठी दुसरीकडे स्थलांतरित केला जाणार असून या कालावधीत त्याला नवे स्वरुप दिले जाईल.

बाजार बंद झाल्यानंतर तेथील माशांचे अवशेष खाणारे उंदिर इतरत्र पसरणार असल्याने नजीकच्या दुकानांसाठी धोका निर्माण झाला आहे. 10 ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यावर आठवडाभर मोहीम राबवावी लागेल, असे सुकुजी येथे उंदिरविरोधी मोहिमेचे नेतृत्व सांभाळणाऱया एका अधिकाऱयाने सांगितले. तेथून उंदरांना बाहेर काढण्यासाठी टोकियोचे अधिकारी अन्य लोकांच्या मदतीने पाईप्स आणि सीव्हेजमधून बाहेर पडण्याचे मागे बंद करणे तसेच अन्य उपाययोजना राबवत आहेत.

 

बाजाराचे पाडकाम करण्यापूर्वी परिसरात 10 फूट उंचीची स्टीलची भिंत उभारली जाईल आणि उंदरांना पिंजऱयात कैद करण्याचा प्रयत्न होईल. उंदरांना पकडण्याठी 40 हजार पिंजरे बसविले जाणार असून 300 किलोग्रॅम विषाचा वापर देखील होणार आहे. बाजारानजीकच्या हॉटेल्स आणि बार व्यवस्थापकांना याबद्दल सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related posts: