|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पती-मुलीची हत्या केल्यावर व्यापाऱयाची आत्महत्या

पती-मुलीची हत्या केल्यावर व्यापाऱयाची आत्महत्या 

अहमदाबाद

 गुजरातमधील एका व्यापाऱयाने कथितरित्या पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केली आहे. कुणाल त्रिवेदी (50 वर्षे) नावाच्या या व्यक्तीने तीन पानी सुसाइड नोट देखील लिहिली आहे. यात कुणालने हत्या आणि आत्महत्येसाठी दुष्टशक्ती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कुणालने स्वतःची आई जयश्री बेन (75 वर्षे) यांनाही विष पाजले होते, त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पत्नी कविता (45 वर्षे) आणि मुलगी शिरीन (16 वर्षे) यांचे मृतदेह शयनगृहात सापडले आहेत. तर कुणालचा मृतदेह घरातील छताला लटकलेल्या स्थितीत आढळला. मी कधीच स्वतःच्या मर्जीने दारू पित नाही. दुष्टशक्ती मला असे करण्यास भाग पाडतात, मी स्वतःच्या देवतांकडे देखील शरण मागितले, परंतु त्यांनी कोणतीच मदत केली नसल्याचे कुणालने पत्रात नमूद केले आहे.

मी अनेकदा कोसळून पुन्हा उभा राहिलो आहे, परंतु कधीच हार पत्करली नाही. पण त्रास आता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दुष्टशक्ती सहजपणे पाठलाग सोडत नसल्याचे कुणालने लिहिले आहे.

Related posts: