|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हार्दिक पटेलचे उपोषण समाप्त, आरक्षणाची मागणी कायम

हार्दिक पटेलचे उपोषण समाप्त, आरक्षणाची मागणी कायम 

अहमदाबाद

 गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलने स्वतःच्या समुदायासाठी आरक्षण तसेच शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू केलेले उपोषण 18 व्या दिवशी समाप्त करण्याची घोषणा बुधवारी केली आहे. हार्दिकने 25 ऑगस्ट रोजी उपोषणास प्रारंभ केला होता. पाटीदार समुदायाचे नेते सी.के. पटेल, नरेश पटेल, जेराम पटेल यांच्या उपस्थितीत हार्दिकने उपोषण समाप्त केले. माझ्यासोबतच समाजाचे अनेक जण बेमुदत उपोषण करत होते. या उपोषणामुळे समाजाची एकता आणि दृढता वाढली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ हे उपोषण समाप्त करत आहे. समाजाच्या वरिष्ठांसमोर झुकेन परंतु सरकारसमोर कधीच मान तुकवणार नसल्याचे हार्दिकने यावेळी म्हटले.

रविवारीच हार्दिकला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

Related posts: