|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ट्रम्प यांच्या सुरक्षा पथकात भारतीय वंशाचा अंशदीप

ट्रम्प यांच्या सुरक्षा पथकात भारतीय वंशाचा अंशदीप 

वॉशिंग्टन

लुधियाना येथे जन्मलेला अंशदीप सिंग भाटिया हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा पथकात सामील होणारा पहिला शीख युवक ठरला आहे. 28 वर्षीय अंशदीपला कठोर प्रशिक्षणानंतर अध्यक्षांच्या सुरक्षा पथकात सामील करण्यात आले आहे. अध्यक्षांच्या सुरक्षा पथकात सामील होण्यासाठी अंशदीपला अधिकाऱयांनी वेशभूषा बदलण्याची सूचना केली होती. परंतु याविरोधात अंशदीपने न्यायालयात धाव घेतली होती.  अंशदीपचे कुटुंब मूळचे कानपूरचे असून 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर ते लुधियानात स्थलांतरित झाले होते. दंगलीत अंशदीपच्या काकाला जीव गमवावा लागला होता. तर त्याच्या वडिलांना तीन गोळय़ा लागल्या होत्या. या दंगलीनंतर अंशदीपच्या आजोबांनी लुधियानात जाण्याचा निर्णय घेतला होता.  यानंतर 2000 साली अंशदीप कुटुंबीयांसोबत अमेरिकेत गेला होता.

Related posts: