|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नवज्योत सिद्धू पुन्हा संकटात

नवज्योत सिद्धू पुन्हा संकटात 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पाक लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारल्याने वादात सापडलेले पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा संकटात सापण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या एका प्रकरणावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना नोटीस पाठविली आहे. हे प्रकरण 1998 मधील असून सिद्धू यांनी कार अपघातावेळी एका व्यक्तीस मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मारहाण झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने सिद्धूंना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली शिक्षा सांगितली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील हा आरोप रद्द करत केवळ दंड करून सुटका केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा या शिक्षेचा पुनर्विचार करावा अशी मागणी करणारी याचिका स्वीकारली आहे. त्यानुसार सिद्धूंना नोटीस पाठविण्यात आली असून त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी स्थिती आहे.